नाशिक : जुने नाशिकमधील काजीगढी आणि इंदिरानगर येथील मदिना लॉन्सजवळील परिसरात चोरट्यांनी घरफोडी करु न ६५ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. कुंभारवाडा येथील शितल अनिल वाघ यांच्या घरात चोरट्याने चोरी केली. खिडकीतून हात टाकून गणपती आराससाठी रचलेली गणपतीची मुर्ती आणि मोबाइल चोरला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत साबीर सादीक सैय्यद यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातील लॅपटॉप, भांडी, रोकड असा एकूण ५८ हजार १०० रु पयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२२हजाराचा ऐवज लंपासनाशिकरोड येथील जगताप मळा परिसरात २२ ते २५ आॅगस्ट दरम्यान चोरट्याने अॅड. प्रदिप वासुदेव गोसावी यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून २२ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. त्यात साड्या, शालु, स्पिकर असा ऐवज आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणरायाच्या मूर्तीसह मोबाईल केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:35 IST
नाशिक : जुने नाशिकमधील काजीगढी आणि इंदिरानगर येथील मदिना लॉन्सजवळील परिसरात चोरट्यांनी घरफोडी करु न ६५ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला.
गणरायाच्या मूर्तीसह मोबाईल केला लंपास
ठळक मुद्देघरातील लॅपटॉप, भांडी, रोकड असा एकूण ५८ हजार १०० रु पयांचा ऐवज लंपास