अभोणा : तालुक्यातील गोसराणे येथील नानाजी शंकर मोरे हे कुटूंबियांसह बाहेर गावी गेलेले असतांना त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरटयांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज लंपास केला.ही घटना मोरे कुटुंबिय रविवारी (दि.३०) घरी आल्यानंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी अभोणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी नानाजी मोरे गोसराणे गावात राहतात. ते शनिवारी (दि.२९) शालकाकडे पत्नीसह येथे गेले होते. यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्याांनी घराच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश केला व पुढील दरवाजाची कडी आतून लावून घेत संसारोपयोगी सामान अस्ताव्यस्त फेकून घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे मणी मंगळसुत्र, टॉप्स, चोखसोने असे दागिने तसेच कांदे विकून मिळालेले रोख रूपये दोनलाख ५३ हजार रूपये तसेच मारूती मंदिर जिर्णोधार पावती पुस्तकातील रोख रक्कम असा एकुण ३ लाख ९३ हजार चारसे पन्नास रु पयांचा ऐंवज लंपास केला.रविवारी (दि.३०) मोरे घरी परतले असता त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून कडी लावल्याचे जाणवले, तर मागील तीनही दरवाजे उघडे असल्याचे तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले व कपाट फोडलेले आढळून आले. त्यांनी अभोणा पोलिसात धाव घेतली. घटनास्थळी कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भेट देत पहाणी केली या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, उपनिरीक्षक दिपक बागुल करीत आहेत.
घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:12 IST
अभोणा : तालुक्यातील गोसराणे येथील नानाजी शंकर मोरे हे कुटूंबियांसह बाहेर गावी गेलेले असतांना त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरटयांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज लंपास केला.
घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास
ठळक मुद्देकळवण तालुक्यातील गोसराणे येथे मध्यरात्रीची घटना