लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथील सर्वात पहिल्या त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेचे चेअरमन मोहन लोहगावकर यांनी रोटेशन प्रमाणे आपल्या पदाचा राजिनामा दिल्यानंतर मंगळवारी (दि.२८) नुतन चेअरमन निवडीसाठी संस्थेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. चेअरमन पदासाठी सुचक म्हणुन संस्थेचे संचालक तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे यानी सुचिवले तर लक्ष्मीबाई पवार यांच्या नावाला जेष्ठ संचालक तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणुन संस्थेचे सचिव महाले यांनी नुतन चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांचे नाव घोषित केले.यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, संतोष कदम, योगेश तुंगार, पप्पु कडलग, सुशीला वारु णसे, कैलास चोथे, कैलास पोरजे, रावसाहेब सकाळे, चिंतामणी अकोलकर, मोहन लोहगावकर, सुनिल अडसरे, किरण अडसरे तसेच समाधान बोडके, भुषण अडसरे आदी उपस्थित होते. (फोटो २८ पवार)
त्र्यंबकेश्वर सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मी पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 18:46 IST
त्र्यंबकेश्वर : येथील सर्वात पहिल्या त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मी पवार
ठळक मुद्देनुतन चेअरमन निवडीसाठी संस्थेची विशेष सभा बोलावण्यात आली