कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले.वाखारी येथील रहिवासी, येवला येथील बँकेत नोकरीस असलेल्या शैलेंद्र गोसावी आणि त्यांचे मोठे बंधू दीपक गोसावी या दोन्ही भावांचे कोरोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ते असलेले शैलेंद्र गोसावी व दीपक गोसावी अचानक इहलोक सोडून गेल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात गोसावी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असून शैलेंद्र गोसावी यांना १ मुलगा, १ मुलगी आहे. दोघेही शिक्षण घेत आहेत.अशा बिकट परिस्थितीत आपल्या मृत वर्गमित्राच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी या हेतूने देवळा येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या बारावी विज्ञान शाखेच्या सन १९९१ बॅचच्या वर्गमित्रांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, अशी पोस्ट ह्यआमनी देवळानी शाळाह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाली. क्षणार्धात त्याला कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील वर्गमित्रांनी प्रतिसाद दिला.या सर्व प्रक्रियेत वर्गमित्र प्रकाश भामरे, सरपंच बापू देवरे, डॉ संजय निकम,डॉ नंदकुमार आहेर, अबीद पठाण,संदीप बुरड आदीनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला.राजधीर फाऊण्डेशनची स्थापनाशैलेंद्र गोसावी यांच्या सोबत देवळा महाविद्यालयात बारावीपर्यंत बरोबर असलेला वर्गमित्र प्रकाश भामरे याने शैलेंद्र गोसावी कोरोना बाधित असून रुग्णालयात दाखल आहे त्याला औषध उपचारासाठी मदतीची गरज असल्यामुळे वर्गमित्रांचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करुन मदतीचे आवाहन केले होते. मदतीपूर्वीच शैलेश यांचे निधन झाल्यामुळे जमा झालेली एक लाख अकरा हजारच्या आसपास रक्कमत्याच्या कुटुंबियाकडे सुपुर्द करण्यात आली. वर्गमित्रांचा अजूनही आर्थिक मदतीचा ओघ सुरूच असून खर्डे येथील राजेंद्र देवरे या वर्गमित्राचेही नुकतेच कोरोनाने निधन झाले. देवरे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सर्व वर्गमित्र पुन्हा सरसावले आहेत. या सर्व वर्गमित्रांनी आता राजधीर फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
वर्गमित्राच्या कुटुंबियाला लाखमोलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:40 IST
कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले.
वर्गमित्राच्या कुटुंबियाला लाखमोलाची मदत
ठळक मुद्देअसाही आदर्श : कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबाला दिला धीर