शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने सिन्नरच्या चौघांची लाखोंनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:05 IST

मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो सांगत चार बेरोजगार युवकांची चार लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर : मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो सांगत चार बेरोजगार युवकांची चार लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मूळ जामगाव येथील विमल साबळे यांना सावळीराम बोडके याने त्याचा चुलत भाऊ राहुल बोडके हा मुंबई महापालिकेत सुशिक्षित मुलांना कामाला लावून देत असल्याचे सांगितले होते.  त्यानंतर १ जून २०१४ रोजी राहुल बोडके जामगाव येथे आला होता. क्लार्क पदासाठी त्याने साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर विमल साबळे यांनी मुलगा चेतन साबळे यास नोकरीला लावून देण्यासाठी चार लाखाची बोलणी केली होती. त्याच दिवशी १ लाख रुपये घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  त्यानंतर १७ जून रोजी मुंबई केईम हॉस्टीपटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी बोलावून तपासणी केली. त्यानंतर लवकरच मुंबई महानगरपालिकेत कामावर हजर करतो असे आश्वासन राहुल बोडके याने दिले होते.त्यानंतर विमल साबळे यांनी वेळोवेळी राहुल बोडके याच्याकडे मुलाच्या कामाबाबत विचारणा केली असता थोड्याच दिवसात कामावर घेतले जाईल असे सांगितले जात होते. काही दिवसांनी मुंबई महानगरपालिकेचे लेटर दाखवून तुमचे काम झाल्याचे सांगून साहेबांची सही बाकी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी संशयित बोडके याने साबळे यांचे नातेवाईक देवेंद्र डगळे याच्याकडून १ लाख, रमेश डगळे याच्याकडून ७ हजार तर विनायक खरबडकर याच्याकडून ५० हजार रुपये घेऊन कामावर लावून देण्याचे सांगितले. मात्र कोणालाही कामाला लावून दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नोकरीला लावून देण्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर पैसे परत देतो असे लेखी लिहून दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी संशयित बोडके याने साबळे यांना २ लाख २० हजार रुपयांचा व २ लाखाचा असे दोन चेक दिले होते. मात्र चेक बॅँकेत वटले नसल्याचे साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विमल साबळे यांनी संशयित राहुल बोडके व सावळीराम बोडके यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र लोखंडे व हवालदार योगेश बुरकूल अधिक तपास करीत आहेत.दोघांविरोधात गुन्हासिन्नर तालुक्यातील मूळ जामगाव येथील रहिवासी व सध्या जेलरोड, नाशिकरोड येथे राहणाऱ्या विमल तुकाराम साबळे या महिलेने संशयित राहुल बाळकृष्ण बोडके व सावळीराम बाबूराव बोडके यांनी आपल्या मुलासह आपल्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी