शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्याचे गज कापून लाखो रुपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 01:22 IST

सिडको येथील सिद्धिविनायक कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुसऱ्यांदा याच बंगल्याला लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदागिन्यांवर डल्ला : चोरट्याने दुसऱ्यांदा केले एकाच बंगल्याला लक्ष्य

सिडको : येथील सिद्धिविनायक कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुसऱ्यांदा याच बंगल्याला लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जुने सिडको भागातील खांडे मळा येथे श्री सिद्धिविनायक कॉलनी येथे सुखात्मे बंगला आहे. या बंगल्यात सुखात्मे दाम्पत्य वास्तव्यास असून, शनिवारी (दि.२४) ते कामानिमित्त बंगला योग्यरीत्या बंद करून घराबाहेर पडले होते; परंतु अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम, असा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ श्वान पथकालाही येथे पाचारण करण्यात आले. सुखात्मे यांच्या बंगल्यातील सर्व खोल्यांमध्ये असलेले कपाटे अज्ञात चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून बंगल्यातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी