शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

आयोगाकडून निवडणूक शाखेला लाखोंचा निधी

By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 14:30 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची आॅनलाइन माहिती भरण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देठेकेदारांना दिलासा : अजुनही लाखो रूपये येणे बाकी

नाशिक : मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकरवी करून घेत त्यांच्या मानधनाची रक्कम देण्यास वेळकाढूपणा करणा-या निवडणूक आयोगाने अखेर नाशिक जिल्ह्यासाठी चौदा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून गेल्या सहा महिन्यांपासून विनावेतन काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त पैसे दिले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी केलेल्या कामाचे अजूनही पाऊण कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची आॅनलाइन माहिती भरण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले आहे. ठेकेदाराने मानधनतत्त्वावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून सदरचे काम हाती घेण्यात आले असून, सदरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक अधिकाºयांकडून तगादा लावण्यात येत आहे. परंतु असे करताना मतदार यादीचे काम करणाºया ठेकेदाराला व पर्यायाने कंत्राटी कर्मचाºयांच्या मानधनाच्या रक्कमेची तजवीज करण्यात मात्र आयोगाकडून गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ चालविली जात आहे. त्यामुळे मतदार यादीचे काम करणाºया कर्मचाºयांमध्ये नैराश्य निर्माण होवून त्यातील अनेकांनी काम न करणेच पसंत केले. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याचे कारण आयोगाकडून दिले जात असल्यामुळे सहा महिन्यांपासून पैसे देण्यात आले नव्हते. या संदर्भात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यावर बुधवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक जिल्'ासाठी १४ लाख ७५ हजार ४२६ रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांचे मानधन देण्याबरोबरच, १ जुलै २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या दरम्यानचे डाटा एंट्रीचे देयक व आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१७ या दोन महिन्यांचे मानधनाचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक