शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

लाखोंची फसवणूक; चौघांना कोठडी

By admin | Updated: January 10, 2017 01:25 IST

नोकरीचे आमिष : ‘आदिवासी विकास’चे बनावट शिक्के, मोटार जप्त

नाशिक : प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून एका बेरोजगार युवकाला सुमारे साडेदहा लाखांना गंडा घालणाऱ्या चौघा भामट्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीसह बनावट शिक्के व कागदपत्रे जप्त केली आहेत.नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ व शिक्के तयार करून त्याद्वारे बेरोजगार युवकांना नोकरीचे नियुक्तिपत्र देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.७) पर्दाफाश केला आहे. बनावट संकेतस्थळ विकसित करणारा संशयित उदयनाथ श्याम नारायण सिंग (रा. भार्इंदर, ठाणे) यास पोलिसांनी रविवारी अटक केली. हेमंत सीताराम पाटील (३१), सुरेश गोकुळ पाटील (३४, दोघेही रा. धुळे), तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. जळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारीच अटक केली आहे. या चौघा संशयित आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१२) पोलीस कोठडी सुनावली आहे. या भामट्यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी संदीप कौतिक पाटील (२६) यास नोकरीचे आमिष दाखवून सतरा लाखांची मागणी केली. पाटील याच्या वडिलांकडून वेळोवेळी पैसे घेत एकूण साडेदहा लाख रुपये उकळले व उरलेल्या साडेसहा लाख रुपयांसाठी भामट्यांनी बनावट शिक्क्याचा वापर व स्वाक्षरी करत फिर्यादीला नोकरीचे शासकीय नियुक्तिपत्रही दिले होते. बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एकूण दहा ते बारा संशयितांची टोळी असून, चौघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)