शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भीमसैनिक मुक्तिभूमीवर नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:46 IST

ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले.

ठळक मुद्देधर्मांतर घोषणा : डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन

येवला : ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले.८३ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो; पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती. या घोषणेच्या ८३ व्या वर्धापनदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करीत दलित समाजातर्फे शनिवारी (दि. १३) मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्रम आयोजित केले. राज्यभरातून लाखो समाजबांधवांनी येथे हजेरी लावली.सकाळपासूनच येवला-विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाखो दलित बांधव मुक्तिभूमीवर नतमस्तक झाले. आमदार छगन भुजबळ, भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष मीराताई आंबेडकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, शिवसेना नेते संभाजी पवार, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माणिकराव शिंदे, उषाताई शिंदे, तहसीलदार रोहिदास वारु ळे, बाळासाहेब लोखंडे, रिपाइंचे गुड्डू जावळे, सुभाष गांगुर्डे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ज्या मैदानावर बाबासाहेबांनी धर्मातंराची घोषणा केली त्या मुक्तिभूमी येथील मैदानावर ध्वजारोहण व क्रांतिस्तंभाला आंबेडकरी जनतेसह अनेकांनी पुष्पहार अर्पण केला. गावा गावांतील कार्यकर्त्यांनी अन्नदानासाठी परिसरात राहुट्या उभ्या केल्या होत्या.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. महिला, युवकांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग दिसून आला.अनेक ठिकाणांहून बसेस, मोटारसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा व पदयात्रेने भीमसैनिक येथे येत होते. डीजेच्या तालावर भीमगीतांचा गजर करीत कित्येक खेडोपाड्यांतून आलेला जनसागर रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत होता. भल्या सकाळी लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने मुक्तिपहाट हा आंबेडकरी शाहिरी जलशाचा कार्यक्र म सकाळी ६ ते १० पर्यंत पार पडला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी मुक्तिभूमी ते विंचूर चौफुलीपर्यंत रॅली काढण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक