येवल्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 06:33 PM2021-04-06T18:33:21+5:302021-04-06T18:34:58+5:30

येवला : दिवसेंदिवस शहरासह तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून खाजगी रूग्णालये देखील आता फुल्ल झाली आहेत. तर अनेक रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येने ऑक्सिजन सिलेंडरची मागणीही वाढल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

Lack of oxygen cylinders in Yeola | येवल्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

येवल्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

Next
ठळक मुद्देकंपन्याची ऑक्सिजन पुरवठा करण्यात असमर्थता

येवला : दिवसेंदिवस शहरासह तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून खाजगी रूग्णालये देखील आता फुल्ल झाली आहेत. तर अनेक रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येने ऑक्सिजन सिलेंडरची मागणीही वाढल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

नाशिक येथून ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपन्या ऑक्सिजन पुरवठा करण्यात असमर्थता दाखवत असून दोन-दोन दिवस गाड्या उभ्या राहूनही नंबर लागत नसल्याने वेळेत सिलेंडर भरून मिळत नसल्याची माहिती स्थानिक ऑक्सिजन पुरवठादार यांचेकडून सांगितली जात आहे.

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सरकारी आरोग्य यंत्रणेने बरोबर खाजगी आरोग्य यंत्रणा देखील महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने खाजगी रूग्णालयांना देखील ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा, या प्रश्‍नी पालकमंत्री भुजबळ यांनी लक्ष घालावे अशी मागणी साईसिद्धि हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीकांत काकड यांनी केली आहे.

Web Title: Lack of oxygen cylinders in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.