शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सातपूरला लाखोंचे नुकसान

By admin | Updated: May 28, 2014 01:18 IST

वादळी पाऊस : ठिकठिकाणी पाण्याचे साचले तळे

वादळी पाऊस : ठिकठिकाणी पाण्याचे साचले तळेसातपूर : वादळीवार्‍यासह झालेल्या रोहिणीच्या पावसाने सातपूर परिसरातील शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान केले असून, जनजीवनही विस्कळीत झाले होते. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सातपूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सातपूर गावातील शिवाजी मंडईतील भाजीपाला, फळविक्रेत्यांना चांगलाच फटका बसला. अर्ध्या तासाच्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. त्र्यंबक रस्त्यावरील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा सर्कल, पद्मश्री बाबूभाई राठी चौक, पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर पावसाच्या पाण्याचे तळेच झाले होते. सातपूर कॉलनी रस्ताही पाण्यात बुडाला होता. पिंपळगाव बहुला येथील शेतकरी सोमनाथ नागरे यांच्या श्रमिकनगर येथील पॉली हाऊसचे वादळीवार्‍याने लाखोंचे नुकसान झाले, तर त्र्यंबक विद्यामंदिर येथील शेतकरी दत्तू ढगे यांच्याही पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले. सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट वजन काट्याजवळील झाड उन्मळून पडले. शिवाजीनगरमधील जिजामाता कॉलनी, सातपूर-अंबड लिंकरोडवरही झाडे उन्मळून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरील झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीला मोकळा केला.