शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मजूरांच्या स्थलांतराचा कंपन्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:18 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेचा ...

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांकडे पाहिले जाते, परंतु लाँकडाऊन घोषित केल्यापासून जवळजवळ दोन महिने होत आले, परंतु कोरोनाच्या स्थितीमध्ये गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच कंपन्या चालू न झाल्यामुळे मजूर व कामगारांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात ४० ते ४५ कंपन्या आहेत.त्या कंपन्यामध्ये जवळजवळ ७० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. हे सर्व मजूर ठेकेदारी पध्दतीवर काम करतात. कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगारांना घरबसल्या वेतन दिले गेले. परंतु ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या मजूरांना वेतन न मिळाल्याने हलाखीचे जीवन जगावे लागले. त्यामुळे या परप्रांतीय मजूरांवर उपासमारीची स्थिती निर्माण झाली. घरी असल्याने, तसेच कंपनी बंद असल्याने या मजूरांना वेतन मिळाले नाही. जे घरात पैसे होते तेही या दिड महिन्यात संपून गेले. लखमापूर व परिसरात भरपूर कंपन्या आहेत. जेव्हा कोरोना व लाँकडाऊन नव्हता तेव्हा जवळजवळ ८० ते ९० टक्के कंपन्या चालू स्थितीत होत्या. बरेच कामगार, मजूर कामावर काम करून आपल्या कुठूंबाचे पालनपोषण करीत होते, पण आता मात्र एक मजूर रस्त्यावरु न दिसत नाही. जर एखादा कामगार रस्त्यावर दिसला तर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देऊन प्रवास करावा लागतो, या सर्व कारणांमुळे लखमापूर व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर परप्रांतीय मजूरांच्या स्थलांतरामुळे मजूर टंचाईची कुºहाड कोसळली आहे ,त्यामुळे यंदाच्या वर्षी अनेक कंपनीचे बाँयलर पेटणार नाही असे संकेत प्राप्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक