शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:09 IST

नाशिक : देशातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले असून, यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे. कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाºया उपायोजना युनेस्को करणार असून, जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जाणार आहे.

ठळक मुद्दे नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

नाशिक : देशातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले असून, यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे. कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाºया उपायोजना युनेस्को करणार असून, जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जाणार आहे.ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेला भारतातील कुंभमेळा आता ग्लोबल होणार असून, युनोच्या मदतीमुळे कुंभमेळ्याला जागतिक उत्सवामध्ये स्थान मिळणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील दोन वर्षांपासून केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत होता. दोन वर्षांनंतर पाठपुराव्याला यश मिळाले असून, आता यापुढे सिंहस्थ कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणारा उत्सव म्हणून ओळखला जाणार असल्याचे खासदार गोडसे म्हणाले.केंद्रीय समितीपुढे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक असणारे ग्रंथ, साहित्य, छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्स पुरावा म्हणून दाखल करण्यात आला होता. केंद्राने नाशिक सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाची पाहणी करणाºया समितीच्या पुराव्याच्या आधारे पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे युनेस्कोने नाशिक सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाला आंतरराष्टÑीय स्वरूपाचा दर्जा बहाल केला आहे.सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने नाशिकला सांस्कृतिक क्षेत्रात यापुढे जागतिक स्तरावर नावलौकिक मिळणार आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची दखल युनेस्को घेणार असून, कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना व संवर्धन युनेस्को करणार आहे. आंतरराष्टÑीय दर्जामुळे संपूर्ण जगातील सांस्कृतिक क्षेत्रात नाशिकला सन्मान मिळणार आहे.-हेमंत गोडसे,खासदारकेंद्राने सादर केला होता प्रस्तावसिंहस्थ कुंभमेळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशातील अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार याप्रमाणे नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा साजरा होत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संस्थानचे विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा या उत्सवाला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करावे, अशी सूचना खासदार गोडसे यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा करून आग्रह धरला होता. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची एक समिती नेमून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. केंद्राने पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे युनेस्कोने सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाला आंतरराष्टÑीय स्वरूपाचा दर्जा बहाल केला आहे.