शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेत कु शल पाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 02:05 IST

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

न्शिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे. कुशल लोढा याने यापूर्वी सीपीटी परीक्षेत देशभरात सहावी वी रँक तर आयपीसीसी परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर पाचवी वी रँक प्राप्त केली होती.सनदी लेखापाल (सीए) विद्याशाखेतील नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत नाशिकच्या कु शल लोढा याने ५६६ गुणांसह शहरात प्रथम, तर देशात पाचवी क्रमवारी पटकावली आहे.कुशलचे वडील संतोष लोढा विकासक असून, आई भारती लोढा गृहिणी आहे. आई आणि वडिलांचे आपल्या यशात अनन्यसाधारण महत्त्व असल्याची प्रतिक्रिया कुशलने व्यक्त केली आहे. त्याच्या पाठोपाठ हर्षाली सोनी ४६१, सोनाली हरजानी ४२१, अंकिता कोलते ४१९ व रितेश सुतार याने ४०७ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत वैशाली केला हिने ४०२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले असून यात भाग्यश्री भंडारी, दीपक कड, काजल चांडक, सागर ढगे, प्रतीक जलोरी, प्रसाद जामदार यांचाही समावेश आहे. आयसीएआय सीए परीक्षेचा फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाचा निकाल येत्या ३ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होणार आहे. सीए फायनल (नवीन अभ्यासक्रम) परीक्षा नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत देशभरातून ५ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जुन्या अभ्याक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत देशभरातून ९ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा