शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

नांदूरशिंगोटेत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी संजीवनी सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 13:28 IST

नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला.

नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला. यावेळी शेवगा लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.नांदूरशिंगोटे मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील विकास संस्थेचे माजी अध्यक्ष संजय आव्हाड यांच्या शेतावर कृषीदिन साजरा करण्यात आला. शासनाच्या व्यापक जनजागृती मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्र मात निफाडचे उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, कृषी सहायक दादासाहेब जोशी आदींसह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आव्हाड यांच्या शेतात शेवगा लागवडीची पाहणी करण्यात आली.उपविभागीय कृषी अधिकारी वाघ यांनी शेवगा लागवडीचे महत्त्व व त्यावर येणाºया कीड व रोग याबाबत माहिती दिली. तसेच दोडी बुद्रुक येथील ब्रम्हानंद स्वामी अँग्रो कंपनीला भेट देवून कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले. कंपनीचे संचालक वसंत आव्हाड यांनी हरभरा दाळी पासून बनविण्यात येणारे पदार्थ याबाबत कृषी अधिकाºयांना माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी गागरे यांनी शेतकर्यांना कडधान्याचे महत्त्व पटवून दिले. तालुक्यातील सर्व कृषी मंडळातील मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक