शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बिबट्यांचा बंदोबस्त करा : कोटमगावात संतप्त लोकभावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:35 IST

दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला.

ठळक मुद्देदोन स्वतंत्र पिंजरे द्या सुरक्षित ‘झोन’ निर्माण कराबिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : दारणा नदीकाठालगत असलेल्या नाशिक तालुक्यातील कोटमगावातील शेतकरी वर्गात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील लोकभावना तीव्र संतप्त असून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामपंचायतकडून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान करण्यात आली.कोटमगावात कवळे वस्तीवर अमोल पेढेकर नावाच्या १४वर्षीय मुलावर तीन दिवसांपुर्वी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात अमोल बचावला; मात्र येथील पंचक्रोशीत अशा प्रकारचे दुर्दैवी हल्ले टाळण्यासाठी या भागात मुक्त संचार करणा-या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच बाळासाहेब म्हस्के यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. यावेळी वरिष्ठ अधिका-यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी म्हस्के यांच्यासह शिवराम घुगे, बाळासाहेब घुगे, श्रीपाद म्हस्के, कारभारी घुगे, पोलीस पाटील सरिता घुगे, साहेबराव म्हस्के यांच्या शिष्टमंडळाने संबंधित वनअधिका-यांकडे केली.

सुरक्षित ‘झोन’ निर्माण कराया भागातील बिबट्यांसाठी वनविभागाने जंगलाची जागा घेऊन तेथे सुरक्षित ‘झोन’ निर्माण करावा आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देत त्या जागेत बिबट्यांचे संवर्धन करावे, अशी सुचना यावेळी उपस्थित गावक-यांनी केली; यावेळी प्रोबेशनरी उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी ‘जंगल आहे कुठे, बिबट्यांना सोडणार कोठे? असा प्रतिप्रश्न केल्यामुळे उपस्थित गावक-यांना रोष वाढला. ‘तुम्ही जंगलतोड रोखत का नाही? जंगल नष्ट झाले कसे? असे उलटप्रश्न केले. यावेळी उपस्थित अन्य अधिका-यांनी याप्रसंगी सारवासारव करत वेळ मारून नेली.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्या