शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांवर आधारित देखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:39 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सिडको : दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सिडको व अंबड भागांत दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने यंदा शंभरांहून अधिक सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना केली असून बहुतांशी मंडळांनी सांगली व कोल्हापूर येथे झालेल्या पूरस्थितीचा देखावा सादर केला आहे. सिडको भागात यंदाच्या वर्षी सिडकोचा महाराजा सिडको वसाहत मित्रमंडळाचे अध्यक्ष अक्षय खांडरे यांनी १८ फुटी भव्य श्री गणेशाचा राजवाडा हा देखावा सादर केला आहे.इच्छामणी कॉलनी, खोडे मळा येथील भैरवनाथ सांस्कृतिक कला व क्रीडामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी नऊ फुटी भव्य गणेशाची आकर्षक मूर्ती हा देखावा, तर वंदे मातरम मित्रमंडळाचे संस्थापक राहुल गणोरे यांनी श्री क्षेत्र शिर्डी साईदरबाराचा देखावा सादर केला आहे. खोडेमळा येथील भैरवनाथ कला, क्रीडा मंडळाचे संस्थापक विजय खोडे यांनी गणेशमूर्ती देखावा सादर केला आहे. तुळजा भवानी चौकातील सिद्धिविनायक मित्रमंडळाने संस्थापक विजय रणाते यांनी यंदाच्या वर्षी आकर्षक गणेशमूर्ती आकर्षण ठरत आहे. जुने सिडको येथील वंदे मातरम मित्र मंडळाच्या वतीने मंडळांचे सस्थापक राहुल गणोरे यांनी श्रीक्षेत्र बालाजीचा देखावा सादर केला आहे.शनिवार आणि रविवारी देखावे पाहाण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. परिसरातील मंडळांनी देखाव्यांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचेदेखील आयोजन केल्यामुळे भाविकांकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळत आहे. भाविकांनी गर्दी वाढू लागल्याने परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.विद्युत रोषणाईने उजळला परिसरखांडेमळा येथील श्री सिद्धिविनायक कॉलनी मित्रमंडळाचे अध्यक्ष गौरव वराडे यांच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य आकर्षक मूर्ती हा देखावा सादर केला आहे. स्वामी विवेकानंदनगर येथील पेलिकन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवि भालेराव यांच्या वतीने यंदाच्या वर्षी महेशमती मंदिराचा देखावा सादर केला आहे. परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे भालेराव याांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव