शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागाने पटकावले केंद्रीय युवक महोत्सवाचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. विविध विभागांतील नऊ पारितोषिके पटकावून त्यांनी विजय मिळविला. विजेत्या कलाकारांची येत्या ७ ते ११ डिसेंबर दरम्यान नाशिक येथेच होणाऱ्या मुक्त विद्यापीठातील इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. विविध विभागांतील नऊ पारितोषिके पटकावून त्यांनी विजय मिळविला. विजेत्या कलाकारांची येत्या ७ ते ११ डिसेंबर दरम्यान नाशिक येथेच होणाऱ्या मुक्त विद्यापीठातील इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील नॅब इमारतीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या या युवक महोत्सवाची सांगता झाली. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक व प्रा. नीलेश सावे यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकवितरण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागाचे संचालक प्रा. डॉ. धनंजय माने होते.व्यासपीठावर मुंबई येथील राजभवनचे प्रतिनिधी प्राचार्य डॉ. प्रमोदजी पाबरेकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालक प्रा. डॉ. विजया पाटील, विद्यापीठाचे वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते.यावेळी सावे म्हणाले की, शिक्षण घेत असताना युवा अवस्थेत मिळेल त्या संधीचे सोने केले पाहिजे. आपली कला सादर करताना त्या कलेपासून आपणास व रसिक श्रोते या दोघांना आनंद मिळाला पाहिजे. विद्यापीठासाठी आपण काय सर्वोच्च योगदान देऊ शकतो याचादेखील विद्यार्थ्यांनी विचार करून त्यानुसार आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे, असे सांगितले.  राजभवन प्रतिनिधी पाबरेकर यांनी आगामी इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.  सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. पवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्राचे अधिकारी, पदाधिकारी, विविध लोककलांचे तज्ज्ञ परीक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक