शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:15 IST

आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

नाशिक : आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.  निमित्त होते, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. तसेच नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, प्रा. नानासाहेब दाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चव्हाण म्हणाले, स्पर्धेच्या या युगात स्वत:ला टिकवून सिद्ध करण्यासाठी अभ्यासासोबत माहिती-तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. एकूण आपले व्यक्तिमत्त्व ‘स्मार्ट’ करण्यावर भर द्यावा.  मंगेश पाडगावकर लिखित ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ या विद्यापीठ गीताने पदवीप्रदान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार पाटील व डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण क रण्याप्रसंगी असलेला विशेष गणवेश परिधान केला होता. याबरोबरच व्यासपीठावर मान्यवरांनीही पदवीदान करतानाचा गणवेश परिधान केला होता.

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी