शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

के के वाघ महाविद्यालयात रंगला पतंगोत्सव, मकरसंक्रातीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केली काळी वेशभूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 6:32 PM

रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये पतंगोत्सवाचा उत्साहमकरसंक्रातीच्या निमित्ताने काळ्या रंगाची वेशभूषा‘मॅफिक’ या सांस्कृतिक महोत्सवालाही सुरुवात

नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली.पतंगोत्सवाच्या माध्यमातून के. के. वाघ महाविद्यालयातील मॅफिक या सांस्कृतिक महोत्सवालाही सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पतंगोत्सवात विद्यार्थ्यांनी परंपरा आणि सणाचा उत्साह साजरा करीत सहभाग घेतला. तसेच मकरसंक्रातीच्या निमित्ताने महाविद्यालयात ब्लॅक डे साजरा करण्यात आला. त्यामुळे बहूतांश विद्यार्थ्यांनी काळा रंगाची वेशभूषा करून या पतंगोत्सवात भाग घेतला. यावेळी उंच उंच ङोपवाणाऱ्या पंतगांचे नियंत्रण करताना वेगवेगळ्य़ा समुहांमध्ये स्पर्धा दिसून आली. सर्वात उंच ङोपावणारे पतंग आपलेच असावे यासाठी पंतगाला ढिल देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विद्यार्थ्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता. तर संधी मिळताच दुसऱ्याची पतंग कापण्याची संधी मिळाल्यानंतर हलगीच्या ठेक्यावर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही सर्वाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी विविधरंगी पतंगासह काईट फेस्टीवलमध्ये सहभाग घेतल्यामुळे महाविद्यालयीन परिसर रंगीत पतंगांनी फुलून गेला होता. दरम्यान, नायलॉन मांजावरील बंदीला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साध्या मांजाने पतंग उडविण्यास पसंती दिली आहे. तरुणाईसाठी पर्यावरण पुरक सण साजरे करण्याच्या दिशेने हा पतंगोत्सव नवीन पायंडा पाडणार असून ही बदलाची नांदी ठरेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kiteपतंगNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी