शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीसाठी पतंगनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:35 IST

येवला : यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज झाले असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते.

येवला : यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज झाले असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते.येवल्यात तीन दिवस चालणाऱ्या पतंगोत्सवासाठी गावातले व्यवहारही अपवाद वगळता बंद असतात. जणू अघोषित बंदच असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपलं वय विसरून सारे पतंग उडविण्यात मग्न असतात. ढोलताशाच्या तालावर आणि ध्वनिक्षेपकाच्या ठणाणत्या आवाजात धुंद होऊन येवलेकर पतंग उडवत असतात, खेळत असतात. पतंगोत्सवाची मोठी खासियत येवलेकरांनी यंदाही मकरसंक्रांतीच्या तब्बल तीन दिवस चालणाºया पतंग उत्सवाची धूम उडविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आवडीचे बहुरंगी-बहुढंगी पतंग उडविण्यासाठी लागणारी येथील आसारी खरेदी करण्यासह पतंगासाठीचा मांजा सूतविण्याकरिता पतंगवेड्या येवलेकरांची सध्या चांगलीच लगबग दिसत आहे. डट्टा, कमान, आसारी यांसह गोंडेदार, मत्सेदार, कल्लेदार, अंडेदार, पट्टेदार अशा पतंगी... काही तरी विचित्र वाचतोय, असं वाटतंय ना ! पण तुम्ही वाचताय हे शब्द मराठीच आहेत. ते इतरत्र बोलले जात नसले तरी नाशिकजवळच्या येवल्यात मात्र सराईतपणे बोलले जातात. अर्थात ही भाषा आहे पतंगासंदर्भातली. पतंगोस्तवाची येवल्याची परंपरा काही खासच आहे. ती एकदा तरी अनुभवावी अशीच आहे.तीन दिवस विविध आकाराच्या पतंगांनी व्यापून जाणारं परिसरातील अवघं आकाश अन् अरे दे ढिल.. ढिल देरे भय्या अशी आरोळीवजा साद घालतांना प्रतिस्पर्ध्याचा पतंग काटल्यावर दुमदुमणारा हा कर्णकर्कश आवाजही येथील पतंगोत्सवाची एक खासियतच.

टॅग्स :Nashikनाशिक