बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:43 PM2020-09-04T22:43:57+5:302020-09-05T01:03:35+5:30

राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

Kingdom of dirt at the bus stop | बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

ंमनमाड बसस्थानकात निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य.

Next
ठळक मुद्देमनमाड : रिपाइंकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन

मनमाड : राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी बससेवा बंद होती. काही महिन्यांपूर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यास प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नुकतेच आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. आगारात सर्वत्र निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार बसस्थानकात सुरू असून, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइं युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, विशाल पाटील, मनीष चाबुकस्वार, अमोल लंकेश्वर, बाळासाहेब खरे, आनंद अंकु श आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: Kingdom of dirt at the bus stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.