मालेगाव : शहरातील वर्दळीचा व शाळा-महाविद्यालयाकडे जाणाऱ्या किदवाई रस्त्यावरील भंगार बाजारासह २२५ अतिक्रमण हटविल्याने रस्त्याने सोमवारी मोकळा श्वास घेतला होता.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेल्या तीन दिवसांपासून धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. सोमवारी शहराच्या पूर्व भागातील मुख्य रस्ता असलेल्या किदवाई रस्त्यावर मोहिम राबविण्यात आली. यावेळी रस्त्यावर भरणारा भंगार बाजार हटविण्यात आला तसेच टपºया, हातगाड्या, छोटी-मोठी दुकाने अशी २२५ अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारक व महापालिकेच्या पथकामध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग निर्माण झाले होते. या मोहिमेचे विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आहे.
किदवाई रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:23 IST