शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाच्या पिकांनी दिली बळीराजाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:16 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : खतांच्या टंचाईने शेतकरीअडचणीत

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, दहेगाव वागळुद, अवनखेड, ओझरखेड, दहिवी आदी परिसरातील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, भात, नागली, खुरसणी, ज्वारी, बाजरी या खरीप हंगामातील पिकांनी चांगला जोमाने वाढण्यास सुरु वात केली आहे. परंतु पिकांसाठी पोषक असलेले खतांची टंचाई निर्माण झाल्याने बळीराजांच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या युरिया टंचाई बळीराजा त्रस्त झाला आहे. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेतआहे.सध्या शेतकरी वर्गासमोर जोमाने आलेल्या खरीप हंगामातील पिकांना जे खाद्य देणे. परंतु ते जर पिकांना वेळेवर नाही भेटले. तर पिके पिवळी पडून पिके नष्ट होतील की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.मध्यंतरी पावसाने आपला लहरीपणा दाखवत पोबारा केला होता. परंतु आता पिकाला पोषक असा पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर हसु निर्माण झाले होते. पण आता खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे.मिळेल त्या ठिकाणाहून आगाऊ खताची बुकिंग करून तसेच तारेवरची कसरत करून आपली पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची त्रेधा तिरपीट उडत आहे. तरी पण आपल्या खरीप हंगामाच्या नियोजनावर पाणी फिरू नये. यासाठी शेतकरीवर्गाने मोर्चा बांधणीला सुरु वात केली आहे.चौकट......सध्या शेतकरी वर्गाला भाजीपाल्याने मायेचा हात दिल्याने, शेतकरी वर्गाला थोडेफार खेळते भांडवल उपलब्ध झाल्याने बळीराजांला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे कठीण संकटात शेतकरी वर्गाला नगदी पिकांनी साथ दिल्याने बळीराजांची नौका थोडी फार का होईना तिराला लागली आहे. त्यामध्ये सध्या कोथिंबीर, कोबी, काकडी,भेंडी व इतर काही ठराविक भाजीपाला यांनी शेतकरी वर्गाला आधार दिला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी