शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

खंडोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:02 IST

अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, सदस्य व ग्रामस्थ, मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघी चंदनपुरी यळकोट यळकोट जय मल्हारच्या निनादाने दुमदुमून गेली तर भंडाºयाच्या उधळणीमुळे चंदनपुरी पंचक्रोशीला सोनेरी किनार प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देचंदनपुरी : ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर; भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण

मालेगाव कॅम्प : अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, सदस्य व ग्रामस्थ, मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघी चंदनपुरी यळकोट यळकोट जय मल्हारच्या निनादाने दुमदुमून गेली तर भंडाºयाच्या उधळणीमुळे चंदनपुरी पंचक्रोशीला सोनेरी किनार प्राप्त झाली आहे.खंडेरायाचे मूळ स्थान जेजुरीनंतर प्रतिजेजुरी श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे गेल्या महिन्यापासून यात्रोत्सवाची तयारी चंदनपुरी ग्रामपालिका, जय मल्हार ट्रस्ट, महसूल, पोलीस प्रशासनातर्फे सुरू होती. ९ तारखेस सकाळी जेजुरी येथून पदयात्रा करीत मशाल ज्योतीचे शहरात आगमन झाले. मनमाड चौफुली ते चंदनपुरी गावापर्यंत मशाल ज्योतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर मंदिरात धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आज १० तारखेस शुक्रवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी देवतांच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक मंदिर परिसर व गावातून काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो मल्हार भक्त सामील झाले होते. मुखवटे मंदिरात आल्यावर मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यावर मल्हारभक्तांसाठी दर्शन खुले करण्यात आले. चंदनपुरीत यात्रोत्सवाच्या अगोदर अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर आज रात्री उशिरा ते पहाटेपासून भक्तांनी रांग लावली होती. पहिल्याच दिवशी एक ते दीड लाख नागरिकांनी यात्रेस हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यात्रेनिमित्त प्रशासनातर्फे वीजपुरवठा, पाणीपुरवठ्यासह परिसराला जोडणाºया रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. पथदीप लावण्यात आले. मंदिर परिसरात अतिगर्दीचा त्रास टाळण्यासाठी स्टीलच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंदिराच्या मोकळ्या जागेत भक्तांसाठी तळी भरणे, नवसपूर्ती, देवभेट, कोटम भरणा, देवाची काठी आदी धार्मिक विधी करण्याची सोय करण्यात आली आहे. विधीमुळे खोबरे, भंडाराची उधळणमुळे अवघे मंदिर व परिसर पिवळे झाले आहे. गोडीशेव, रेवडी यावर ताव मारताना दिसत आहे. यात्रेत करमणूक करण्यासाठी मोठे झोके, पाळणे, चक्रीझुला, जादूचे प्रयोग आदी आले आहेत तर काही दिवसांनी महाराष्टÑातील प्रख्यात तमाशा फड येणार असल्याचे सांगितले. यात्रेत गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गिरणापूल शालिमार चौफुली आदी परिसरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रोत्सव प्रारंभ प्रसंगी ज्येष्ठ सदस्य राजेंद्र पाटील, राजू अहिरे, उपसरपंच कैलास शेलार, सदस्य सुभाष पवार, मनोहर जोपळे, विनोद शेलार, समाधान उशिरे, बापू हरपळे, महिला सदस्या अलका पवार, विमलबाई पवार, मंगळाबाई पवार, आशाबाई मांडवडे, रोशना सूर्यवंशी, केतकी सूर्यवंशी, उज्ज्वला शेलार यांच्यासह ग्रामसेवक टी.एम. बच्छाव, शालिंदर जीवरक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व मल्हार भक्त उपस्थितहोते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम