नशिक : खांदेश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ३ नोहेंबरपासून दोन दिवसीय खांदेश साहित्य-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खांदेश अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्ष विजया मानमोडे यांनी पत्रपरिषदेत दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे संमेलनाचे अध्यक्षपद भूषणविणार असल्याचे मानमोडे यांनी सांगितले. याप्रसंगी वंदना वनकर, आनंद करंजकर अमोल थोरात आदि उपस्थित होते. महोत्सवात पहिल्या दिवशी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून उमेश राठी, महोत्सव अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रमुख पाहुणे नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, स्वागताध्यक्ष सलीम शेख. कार्यध्यक्ष महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा उपस्थित राहणार असून, दुसऱ्या दिवशी समारोप सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, आयुक्त अभिषेक कृष्णा, अध्यक्ष उत्तम कांबळे, योगेश शिरसाठ, श्याम राजपूत, वंदना वनकर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी मानमोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
३ नोव्हेंबरपासून खांदेश साहित्य महोत्सव
By admin | Updated: October 22, 2016 01:23 IST