शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळे येथील तरु णाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

तालुक्यातील खंबाळे येथील तरु णासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरु णीच्या नातेवाइकांनी सदर तरु णाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथील तरु णासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरु णीच्या नातेवाइकांनी सदर तरु णाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरु णाच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात गोंदे व दोडी येथील ७ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.राहुल साहेबराव भालेराव (२४), रा. खंबाळे या तरु णाचे गोंदे येथील तरु णीशी प्रेमसंबंध असून, ते दोघे कोर्टात जाऊन लग्न करणार होते. मात्र राहुल हा अन्य समाजातील असल्याने सदर तरु णीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. सोमवारी दुपारी राहुल दुचाकीवरून (क्र.एमएच ०४ जेए ०२२६) सिन्नरकडे जात असताना गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सचिन सुरेश आव्हाड, सुरेश विठ्ठल आव्हाड, रामदास आव्हाड, मंगेश, गौरव व सोमनाथ, (सर्व रा. गोंदे ) व दोडी येथील पोलीसपाटील सुदाम पाटील यांच्यासह इतर अनोळखी ७ ते ८ जणांनी त्यांची गाडी आडवी लावून राहुलची दुचाकी थांबवली. त्याला जवळच असलेल्या नटराज सांस्कृतिक कला केंद्राच्या पाठीमागे ओढत नेऊन सर्वांनी मारहाण करायला सुरु वात केली. त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. मोबाइल हिसकावून घेत सिमकार्ड तोडून टाकले. नातेवाइकान्ांंी त्याला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असून ,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव पिडले याप्रकरणी तपास करीत आहेत.जखमी अवस्थेत तरुणाला घेतले ताब्यातसदर मुलीच्या घरासमोर नेऊन राहुलला पुन्हा मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या मुलीसोबत लग्न करायची तुझी लायकी नाही असे सांगत धमकावले. राहुलला पोलिसांकडे न नेता रस्त्यात एखाद्या वाहनाखाली टाकून द्या असेही मारहाण करणारे म्हणत होते. याबाबत नातेवाइकांना समजल्यावर गोंदे फाटा परिसरातून जखमी अवस्थेत राहुलला ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी