शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

भाजपा नगरसेवकांमध्ये खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:00 IST

महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे.

नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे. काही नगरसेवक उघडपणे स्थानिक पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करू लागल्याने येत्या काळात भाजपात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या अनेक विकासकामांना कात्री लागल्याने भाजपासह विरोधी नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यातच, आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच विकासकामे होणार असल्याचे स्पष्ट केल्याने कोणत्याही नव्या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवरून धुडकावला जाऊ लागला आहे. अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेली कामेच होतील आणि सदर कामांना अंदाजपत्रकीय विशेष महासभेतच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असल्याने ती कामे पुन्हा महासभेवर येणार नाहीत. परिणामी, गेल्या तीन महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये एकही प्रस्ताव दाखल होऊ शकलेला नाही. केवळ इतिवृत्तांना मंजुरी देण्याचेच काम महासभेला उरले आहे. नवीन कामे घेतली जाणार नसल्याने महापालिका मुख्यालयातील नगरसेवकांची वर्दळही रोडावली आहे. आयुक्तांनी तक्रारींसाठी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप आणल्याने आणि या अ‍ॅपवर नगरसेवकांनीही तक्रारी कराव्यात, असे सांगितले जात असल्याने नगरसेवकांचे नेमके काम काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. सत्तेत असूनही बेदखल केले जात असल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर दिसून येत आहे.खांदेपालटाची शक्यताभाजपाच्या हाती सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात ठोस अशी कोणतीही कामे न झाल्याने सत्ताधारी भाजपात कमालीचा रोष आहे. त्यातच आयुक्तांची ‘एकला चलो रे’ भूमिका असल्याने नगरसेवकांना काहीच काम उरले नसल्याची भावना बळावत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रभागातील कामेही ठप्प झालेली आहेत. मंजूर कामेही रद्द करण्यात आलेली आहेत. जून महिन्यात महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांनी यापूर्वीच या पदाधिकाºयांचे राजीनामे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे एकूणच स्थिती पाहता, जून महिन्यात खांदेपालट होण्याची शक्यता असून, भाजपा संघटन पातळीवरही मोठ्या प्रमाणावर फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका