भगव्याची विजयी घोडदौड कायम ठेवा! : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:41 AM2018-07-01T01:41:48+5:302018-07-01T01:42:14+5:30

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ३०) मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

 Keep the saffron victory! : Uddhav Thackeray | भगव्याची विजयी घोडदौड कायम ठेवा! : उद्धव ठाकरे

भगव्याची विजयी घोडदौड कायम ठेवा! : उद्धव ठाकरे

Next

येवला : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ३०) मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, विजयाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, संघटन वाढवा व येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी एकदिलाने काम करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.  यावेळी दराडे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक लढविण्याच्या पद्धतीला ठाकरे यांनी दाद देत कौतुक केले. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी किशोर दराडे यांचे औक्षण करून मातोश्रीवर फक्त मंत्र्यांचेच औक्षण केले आहे, तुम्ही पहिले आमदार असल्याचेही त्या म्हणाल्या.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी किशोर दराडेंना पेढा भरवत भगवी शाल देऊन सत्कार केला. दराडेंसह राज्यमंत्री दादा भुसे व टीडीएफचे नेते संभाजी पाटील यांचाही सत्कार केला. या प्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, संभाजीराजे पवार, महेश बडवे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, शिक्षक सेनेचे नेते संजय चव्हाण, शेट्ये, वाघ आदी उपस्थित होते.
पाचवा भाऊ करून घ्या !
यावेळी निवडणुकीच्या गप्पा मारताना ठाकरे यांनी किशोर दराडेंना आपण किती भाऊ आहेत हा प्रश्न केला. यावर दराडे यांनी चार भाऊ असल्याचे सांगताच ठाकरे यांनी मलाही पाचवा भाऊ करून घ्या म्हणजे सेनेला चांगले दिवस येतील, असे म्हणत विनोद केला. ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत एकत्रित बसून फोटोसेशनदेखील केले.

Web Title:  Keep the saffron victory! : Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.