देवळा : भारतीय जनता पक्षाच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी व सहनिवडणूक अधिकारी नंदकुमार खैरनार यांनी ही घोषणा केली.मंगरूळ येथे निवडणुकीसाठी विशेष मेळावा झाला. जिल्हाध्यक्षपदासाठी १८ उमेदवार इच्छुक होते.या निवडणुकीत १७ इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे आहेर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी खासदार भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जि. प. सदस्य मनीषा पवार, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, बूथप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते.
भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:22 IST