नाशिक : विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आल्यानंतर संशयितांना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केलेल्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल यास न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी पोलिसांनी बागुल याची कसून चौकशी केल्यानंतर मोक्कातील संशयितांना सर्व प्रकारची मदत केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याने श्रमिक वाहतूक सेना, कामगार सेना, हॉकर्स सेना अशा विविध संघटनांची पदे भूषविणाऱ्या बागुल याला अटक केली होती. बागुल याची गुरुवारी सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली होती; मात्र या चौकशीत बागुलने समाधानकारक माहिती दिली नाही. पोलिसांचा संशय बळावल्याने गुन्हेगारांना पाठबळ देणे, वेळोवेळी आर्थिक मदत करणे, आश्रय देणे तसेच विविध गुन्ह्यांसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून बागुल याला मोक्का अन्वये अटक केली होती. (प्रतिनिधी)
मोक्कातील गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी कोठडी
By admin | Updated: July 30, 2016 00:41 IST