शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कश्यपीचे पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:16 IST

सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त आक्रमक : सोमवारच्या बैठकीनंतर होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला. महापालिकेने धरणाच्या पाण्याची जबाबदारी नाकारली असून, ज्यांच्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या गेटवरच अडवून ठेवण्यात आले. अखेर प्रकल्पग्रस्तांशी सोमवारी बैठक घेण्याचे मान्य करत पाणी न सोडताच, पाटबंधारे व पोलीस खाते माघारी परतले.

सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांनीदेखील सकारात्मकता दर्शवून धरणातील पाणी सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे खात्याचे मिसाळ, तांदळे या अधिका-यांनी हरसूल पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त घेऊन कश्यपी धरणाचे पाणी सोडण्यासाठी दाखल झाले. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त धोंडेवाडी, खाड्याची वाडी आदी गावांमध्ये पसरताच, तत्काळ शेकडो प्रकल्पग्रस्तांनी धरणावर धाव घेऊन अधिका-यांना पाणी सोडण्यापासून मज्जाव केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांना मज्जाव करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वादविवाद झाला. नाशिक महापालिकेने कश्यपी धरणाच्या पाण्याची गरज नसल्याचे कळविले असल्यामुळे कश्यपीचे पाणी कोणासाठी सोडले जात आहे, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला. ज्यांच्यासाठी पाणी सोडले जात आहे, त्यांनी प्रश्न सोडवावेत व मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली. त्यावर जिल्हाधिका-यांचे आदेश असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता, जिल्हाधिकाºयांना धरणावर बोलवा, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतीला पाटबंधारे खात्याने पत्र द्यावे, असे ठरलेले असताना अचानक पाणी सोडण्याचा उद्देश काय असा सवाल केला

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय