शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार

By संजय पाठक | Updated: August 17, 2020 01:22 IST

शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देगोंधळ कायम : मनपाचे पाच कोटी जलसंपदाकडे पडून

नाशिक : शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणताही करार झाला नसला तरी प्रकल्पग्रस्तांचे महापालिकेच्या सेवेतच पुनर्वसन करण्याचे जलसंपदा विभागाचे प्रयत्न मात्र कायम आहे.नाशिक महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली मात्र पहिल्याच वर्षी जिल्ह्णात मोठा दुष्काळ पडला पाऊसच होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणामधील साठा आटला होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील साठा तळापर्यंत गेल्याने खळबळ उडाली होती. धरणातील गाळा मध्ये पंप बसवून पाणी उपसा करण्यात आला आणि हे पाणी कालव्यात सोडून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला शहराची ही स्थिती लक्षात आल्यानंतर भविष्यात असे संकट उद्भवू नये यासाठी तत्कालीन महापौर (कै.) शांतारामबापू वावरे आणि अन्य लोकप्रतिनिधींनी गंगापूर धरणाला पूरक असे कश्यपी धरण बांधण्यासाठी पुढाकार घेतला.कश्यपी धरण बांधण्यासाठी दिलेल्या पाच कोटी रुपयांचे पुढे काय होणार याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र जलसंपदा विभाग हा प्रश्न टाळत आहे. महापालिकेच्या वतीने धरण बांधण्यात आर्थिक सहभाग दिल्याचे निमित्त करून जलसंपदा विभागाने आधी २४ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरी देण्यास भाग पाडले आणि आता ३६ प्रकल्पग्रस्तांना अशाप्रकारे सेवेत घेण्यासाठी दबाव वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण