शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा गुंता वाढला;चेंडू शासनाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:23 IST

शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले

ठळक मुद्दे महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने

नाशिक : कश्यपी धरणासाठी जागा दिलेल्या शेतकºयांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास महापालिकेच्या महासभेने मान्यता दिली असली तरी, तरी त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी कोणती पद्धत अवलंबवावी याविषयी पाटबंधारे, महापालिका व पुनवर्सन या तिन्ही खात्यांमध्ये एकमत होत नसल्याने आता त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे ज्या ३६ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी नावे निश्चित करण्यात आली, त्यांच्या नावाला गावातीलच अन्य प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविल्यामुळे नोकरीचा गुंता आणखीनच वाढला आहे.नाशिक शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यानुसार प्रारंभी महापालिकेने २४ वारसांना त्याचवेळी सेवेत सामावून घेतले व उर्वरिताना टप्प्याटप्प्याने नोकरी देण्याचे ठरविले, दरम्यान महापालिकेची नोकर भरती करताना शासनपातळीवरच धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. जवळपास पंचवीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या सेवेत नोकरी मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने व पाठपुरावा करूनही आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे पाहून दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली, परिणामी शासन पातळीवर त्याची दखल घ्यावी लागली. महापालिकेसाठी धरण बांधण्यात आले असले तरी, त्याची उभारणी पाटबंधारे खात्याने केली व धरणासाठी जमीन संपादनाचे काम जिल्हाधिकाºयांनी केले त्यामुळे तिन्ही खात्यांशी निगडित असलेल्या या प्रश्नावर एकमत होत नसल्याने राज्य सरकारने त्यात मध्यस्थी करीत उच्चस्तरीय समिती गठित केली व या समितीने प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली. समितीच्या या निर्णयावर शासनानेही शिक्कामोर्तब केले, त्यानुसार महापालिकेने अलीकडेच झालेल्या महासभेत या विषयाला मंजुरी देत ३६ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक