लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : अयोध्या येथील राम जन्म भूमी पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहर व हेडगेवार पतसंस्था यांच्या वतीने १९९२ साली अयोध्या येथे इगतपुरी येथून कारसेवेसाठी गेलेल्यांचा सत्कार करण्यात आला.अयोध्देला बाळकृष्ण बेदरकर, कै. सूर्यकांत गायकवाड, बळीराम रेड्डी, किशोर बटाटे, जगन शिंदे इत्यादी कारसेवक गेले होते, तेथून येताना कै. गायकवाड यांनी सोबत आणलेल्या त्यावेळच्या विटेचे बुधवारी (दि.५) पूजन करून सर्व कार सेवकांचा तसेच कै. सूर्यकांत गायकवाड यांच्या पत्नी निर्मला गायकवाड यांचाही त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी किरण फलटणकर, शांतीलाल चांडक, विजय गुप्ता, प्रकाश नावंदर, संजय भाटिया, अजित पारख, कृष्णा परदेशी, शैलेश शर्मा, कृष्णा करवा, सागर परदेशी, तिवारी, महेश मुळीक, प्रकाश चांडक, दिनेश गायकवाड, राजेश जैन, अॅड. पूजा भाटिया, अर्चना भाटिया आदी उपस्थित होते.
इगतपुरी येथे कारसेवक यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:28 IST
इगतपुरी : अयोध्या येथील राम जन्म भूमी पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहर व हेडगेवार पतसंस्था यांच्या वतीने १९९२ साली अयोध्या येथे इगतपुरी येथून कारसेवेसाठी गेलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
इगतपुरी येथे कारसेवक यांचा सत्कार
ठळक मुद्दे कै. सूर्यकांत गायकवाड यांच्या पत्नी निर्मला गायकवाड यांचाही त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.