कनाशी : कळवण तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कनाशीच्या सरपंचपदी वंदना काशिनाथ चौरे, तर उपसरपंचपदी नितीन बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कनाशी ग्रामपंचायतीच्या आवर्तन पद्धतीने सरपंच व उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. एस. बागुल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात विहित मुदतीत सरपंचपदासाठी वंदना चौरे, तर उपसरपंचपदासाठी नितीन बोरसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बागुल यांनी केली. निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई गोविंद, मीना गावित, रवींद्र बहिरम, छबीबाई गोधडे, सुशीला जाधव, रंजना बोरसे, निंबा पाटील, ग्रामविकास अधिकारी एम. बी .पवार, केदा वाघ, भास्कर पगार, गंगाधर पवार, अनिल निकुंभ, अशोक बोरसे, भूषण देसाई, राजेंद्र जाधव, यशवंत बोरसे, सोहन महाजन, राजेंद्र बिरारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
कनाशीच्या सरपंचपदी चौरे
By admin | Updated: January 5, 2017 23:07 IST