शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:11 IST

शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला

कळवण : शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे. याबाबत लोकमतने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. सदरच्या वृत्ताची दखल घेत वीज वितरण कंपनीने रोहित्र हटविाले आहे. वीज कंपनीने शहरात सर्वेक्षण करून गरज नसताना उभे असलेलेखांब हटविण्याची गरज असल्याचे मत कळवणकर जनतेने व्यक्त केले आहे.कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर भागातील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिरादरम्यान रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व डांबरीकरणांतर्गत कामास पावसाळ्यानंतर पुन्हा सुरुवात झाल्याने शिवाजीनगरकरांच्या चेहºयावर समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या रस्त्यावर बीके कॉम्प्लेक्ससमोर रस्त्यातच असलेले रोहित्र रस्त्याच्या विकासाला व वाहतुकीला अडथळा ठरत होते. अखेर २० वर्षांनंतर ते तेथून हटविल्याने पादचारींनी व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नगर पंचायतचे गटनेते कौतिक पगार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार, तहसीलदार कैलास चावडे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण गांगुर्डे यांनी आज घेतलेल्या पुढाकारातून रस्त्यावरील रोहित्र हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. नगरपंचायत असलेल्या कळवणचा दिवसागणिक विस्तार शहराच्या चारही बाजूने वाढत असल्याने लोकसंख्यादेखील वाढली आहे. त्याबरोबरच शहरात वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. आता शहरातील रस्तेदेखील अपुरे पडू लागल्याने रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण करण्याच्या कामावर कळवण नगरपंचायतने भर दिला आहे. आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या सहकार्याने कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व गटनेते कौतिक पगार यांनी विशेष लक्ष घालून दुर्लक्षित रस्त्याकडे लक्ष केंद्रित केल्याने नगरपंचायत हद्दीतील विविध भागातील रस्त्यांवरील वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीज पुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब हे अडथळा ठरू पहात असल्याने आता त्यांचे सर्वेक्षण करून खांब काढण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. शिवाजीनगरमधील बीके कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत असल्याने व रोहित्र रस्त्याजवळच असल्याने रस्त्याने जाताना जीव मुठीत धरूनच पादचाºयांना प्रवास करावा लागत होता. शिवाय तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी या रोहित्राच्या भोवताली वाहनाची मोठी गर्दी होत होती. शिवाय दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. शिवाजीनगरमधील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कळवण नगरपंचायतने हाती घेतले असल्याने या रस्त्यांच्या रुंदीकरणाला अडथळे निर्माण ठरणारे रोहित्रासह विजेचे खांब अन्यत्र हलविण्यात वीज वितरण कंपनीला महसूल व नगरपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मदतीने यश आले आहे. शिवाजीनगर भागातील वीजपुरवठ्याचे वीज वितरण कंपनीने नियोजन करून वीज खांबांचे सर्वेक्षण करून येथील अनावश्यक खांब हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPower Shutdownभारनियमन