इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले होते. महिलांचे हाल पाहून महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे आणि कळसुबाई मित्र मंडळाने बर्डेवाडीकरांना पाण्यासाठी टाक्यांची मदत केली.राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार आगामी काळात कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी भक्कम पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान पाण्यासाठी साठवणुकीची टाकी मदत म्हणून मिळाल्याने आदिवासी महिलानी समाधान व्यक्त केले.भगीरथ मराडे यांच्या कळसुबाई मित्रमंडळाच्या कार्यकत्यांनी बर्डेवाडीत जाऊन पाणीटंचाईवर काय उपाययोजना करता येतील ह्याची सविस्तर माहिती घेतली. टँकर आणि बाहेरून आणण्यात येणारे पाणी साठवण्यासाठी गावाला टाक्यांची गरज होती. नागरिकांशी चर्चा केल्यानंतर२ हजार लिटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या मदत म्हणून देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त बर्डेवाडीला भक्कम आधार देण्याचे कार्य महाराष्ट्र नविनर्माण सेना आण िकळसुबाई मित्र मंडळाने केले. आगामी काळात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कार्यरत राहू असे पदाधिकार्यांनी सांगितले.
बर्डेवाडीकरांना पाणी पाजण्यासाठी सरसावले कळसुबाई मित्र मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:11 IST
इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले होते. महिलांचे हाल पाहून महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे आणि कळसुबाई मित्र मंडळाने बर्डेवाडीकरांना पाण्यासाठी टाक्यांची मदत केली.
बर्डेवाडीकरांना पाणी पाजण्यासाठी सरसावले कळसुबाई मित्र मंडळ
ठळक मुद्देआदिवासी महिलानी समाधान व्यक्त केले.