शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला ४० गावांचा कारभार पाहतात महिला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 00:23 IST

महिलाराज : दोन तालुक्यातील ४६ गावांची पाटीलकी घेतली हाती

 मनोज देवरे  कळवणकळवण व सुरगाणा या १०० टक्के आदिवासी तालुके असलेल्या कळवण उपविभागातील गावांची पाटीलकी करणाऱ्या पोलीस पाटलांचे १५७ पदे रिक्त असून, त्यात कळवण तालुक्यातील ६५, तर सुरगाणा तालुक्यात ९२ गावांचा समावेश आहे. कळवण तालुक्यात पोलीसपाटीलचे एकूण १५५ पदे असून, ९० गावांना तर सुरगाणा तालुक्यात एकूण पदे २१४ असून, १२२ गावांचा पोलीसपाटील काम पाहत आहेत. राज्य शासनाने पोलीसपाटील या पदाच्या भरतीला हिरवा कंदील दिल्याने कळवण व सुरगाणा तालुक्यांचे आरक्षण सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत नुकतेच काढण्यात आल्याने कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील 46 गावांची पाटीलकी महिलांच्या हाती असणार आहे.शासनाच्या नवीन निकषानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले असून, ११३ ठिकाणी खुले तर इतर मागास प्रवर्गासाठी- २१ अनुसूचित जमातीसाठी- २१ असे आरक्षण जाहीर झाले आहे. शासनाच्या निकषानुसार ३० टक्के महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले असून, यामध्ये खुल्या जागेसाठी ३४ महिला, इतर मागासवर्गसाठी- ६, अनुसूचित जमातीसाठी- ६ अशा ४६ जागी महिलांना कळवण व सुरगाणा तालुक्यात पोलीसपाटील म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.कळवण उपविभागातील मानूर, शिरसमणी, खडकवण, जयपूर, जयदर, राहुडे या सहा गावांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले असून, असोली, मोहनदरी, जामले (हा), करंभेळ (हा), भाकुर्डे, शिवभांडणे या सहा गावांचे इतर मागासप्रवर्ग महिलासाठी आरक्षण निघाले, तर खुला प्रवर्गमहिलांसाठी पळसन, गंगापूर, पांगारणे, जाहुले, घोडाबे, हडकाईचोंड, गहाले, हट्टी बु।।, जांभूळपाडा, वडपाडा सु., उदयपूर, भोरमाळ, चिंचले, पिळूकपाडा, पायरपाडा, कळमणे, पिंपळचोड, आमझर, सुभाषनगर, खोकरविहीर, लखानी, दोडीपाडा, रांजूने, मोठामाळ, उंबरदे, सादड विहीर, नवापूर, सांभरखल, गुरटेंभी, आमदा बा., आमदा प., संजयनगर, हेमाडपाडा, साबरदरा या गावांचे आरक्षण निघाले. तसेच भटक्या विमुक्त जमाती अ, ब साठी माचीधोडप व जिरवाडे (हा) या गावांचे आरक्षण निघाले. आता ४६ गावांमध्ये महिलांसाठी पोलीसपाटील पदाचे आरक्षण निघाल्याने या गावांची पाटीलकी महिलांच्या हाती आली आहे. १११ गावांमधील पाटीलकी पुरु ष करणार असल्याने आता १५७ गावांतील पाटीलकी करण्यासाठी गावागावांत स्पर्धा रंगणार आहे. राजकीय दबावामुळे पात्रता असूनही अन्याय होत असल्यामुळे शासनाने पोलीसपाटील भरतीचे निकष बदल्यामुळे शैक्षणिक पात्रतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. लवकरच लेखी परीक्षा घेऊन या नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली.पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवाकळवण तालुक्यातील १५२ गावांपैकी ६५ गावांमध्ये पोलीसपाटील पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. पोलीसपाटील म्हणजे पोलीस प्रशासनाचा ग्रामीण भागातील दुवा. मात्र, बहुतांश गावांत पोलीसपाटीलच नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर सातत्याने होत आहे. पोलीस पाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी आहे. कळवण तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची पोलीस व महसूल विभागाने प्रक्रिया दरम्यानच्या काळात राबवली होती; मात्र त्या भरतीला स्थगिती आल्यानेभरती प्रक्रिया लांबली आहे, ही स्थगिती शासनाने उठवल्याने आणि पोलिसपाटील पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने पोलीसपाटील प्रक्रि या महसूल विभागाने लवकर राबवावी, अशी मागणी पुढे आली आहे. (वार्ताहर)