मनोज देवरे कळवणकळवण व सुरगाणा या १०० टक्के आदिवासी तालुके असलेल्या कळवण उपविभागातील गावांची पाटीलकी करणाऱ्या पोलीस पाटलांचे १५७ पदे रिक्त असून, त्यात कळवण तालुक्यातील ६५, तर सुरगाणा तालुक्यात ९२ गावांचा समावेश आहे. कळवण तालुक्यात पोलीसपाटीलचे एकूण १५५ पदे असून, ९० गावांना तर सुरगाणा तालुक्यात एकूण पदे २१४ असून, १२२ गावांचा पोलीसपाटील काम पाहत आहेत. राज्य शासनाने पोलीसपाटील या पदाच्या भरतीला हिरवा कंदील दिल्याने कळवण व सुरगाणा तालुक्यांचे आरक्षण सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत नुकतेच काढण्यात आल्याने कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील 46 गावांची पाटीलकी महिलांच्या हाती असणार आहे.शासनाच्या नवीन निकषानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले असून, ११३ ठिकाणी खुले तर इतर मागास प्रवर्गासाठी- २१ अनुसूचित जमातीसाठी- २१ असे आरक्षण जाहीर झाले आहे. शासनाच्या निकषानुसार ३० टक्के महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले असून, यामध्ये खुल्या जागेसाठी ३४ महिला, इतर मागासवर्गसाठी- ६, अनुसूचित जमातीसाठी- ६ अशा ४६ जागी महिलांना कळवण व सुरगाणा तालुक्यात पोलीसपाटील म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.कळवण उपविभागातील मानूर, शिरसमणी, खडकवण, जयपूर, जयदर, राहुडे या सहा गावांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले असून, असोली, मोहनदरी, जामले (हा), करंभेळ (हा), भाकुर्डे, शिवभांडणे या सहा गावांचे इतर मागासप्रवर्ग महिलासाठी आरक्षण निघाले, तर खुला प्रवर्गमहिलांसाठी पळसन, गंगापूर, पांगारणे, जाहुले, घोडाबे, हडकाईचोंड, गहाले, हट्टी बु।।, जांभूळपाडा, वडपाडा सु., उदयपूर, भोरमाळ, चिंचले, पिळूकपाडा, पायरपाडा, कळमणे, पिंपळचोड, आमझर, सुभाषनगर, खोकरविहीर, लखानी, दोडीपाडा, रांजूने, मोठामाळ, उंबरदे, सादड विहीर, नवापूर, सांभरखल, गुरटेंभी, आमदा बा., आमदा प., संजयनगर, हेमाडपाडा, साबरदरा या गावांचे आरक्षण निघाले. तसेच भटक्या विमुक्त जमाती अ, ब साठी माचीधोडप व जिरवाडे (हा) या गावांचे आरक्षण निघाले. आता ४६ गावांमध्ये महिलांसाठी पोलीसपाटील पदाचे आरक्षण निघाल्याने या गावांची पाटीलकी महिलांच्या हाती आली आहे. १११ गावांमधील पाटीलकी पुरु ष करणार असल्याने आता १५७ गावांतील पाटीलकी करण्यासाठी गावागावांत स्पर्धा रंगणार आहे. राजकीय दबावामुळे पात्रता असूनही अन्याय होत असल्यामुळे शासनाने पोलीसपाटील भरतीचे निकष बदल्यामुळे शैक्षणिक पात्रतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. लवकरच लेखी परीक्षा घेऊन या नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली.पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवाकळवण तालुक्यातील १५२ गावांपैकी ६५ गावांमध्ये पोलीसपाटील पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. पोलीसपाटील म्हणजे पोलीस प्रशासनाचा ग्रामीण भागातील दुवा. मात्र, बहुतांश गावांत पोलीसपाटीलच नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर सातत्याने होत आहे. पोलीस पाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी आहे. कळवण तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची पोलीस व महसूल विभागाने प्रक्रिया दरम्यानच्या काळात राबवली होती; मात्र त्या भरतीला स्थगिती आल्यानेभरती प्रक्रिया लांबली आहे, ही स्थगिती शासनाने उठवल्याने आणि पोलिसपाटील पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने पोलीसपाटील प्रक्रि या महसूल विभागाने लवकर राबवावी, अशी मागणी पुढे आली आहे. (वार्ताहर)
कळवणला ४० गावांचा कारभार पाहतात महिला सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 00:23 IST