शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांसाठी ‘कालिदास’ खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:06 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.महाकवी कालिदास कलामंदिराचे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यातून त्याचे रूपडे पालटल्यानंतर त्याचे दरदेखील वाढविण्यात आले आहेत. अनेक प्रकारचे नियम बदलण्यात आले आहेत. कालिदासचे नवे रूप ‘जैसे थे’ रहावे आणि त्याला बाधा येऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने परस्परच शाळांच्या स्नेहसंमेलनाला परवानगी दिली जात नसल्याचेउघड झाले आहे. शाळांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या उत्साहात खुर्च्यांची मोडतोड होऊ शकते, असे गृहीतक मांडून परस्पर शाळांना स्नेहसंमेलनासाठी परवानग्या नाकारल्या जात होत्या. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर निमसे यांनी शाळांच्या स्नेहसंमेलनासाठी कलामंदिर खुले करण्याचे आदेश व्यवस्थापन जगन्नाथ कहाणे यांना दिले आहे.दरम्यान, नाट्य व्यावसायिक जयप्रकाश जातेगावकर आणि राजेंद्र जाधव यांनी सभापती निमसे यांची नुकतीच भेट घेतली जाचक नियम बदलण्याची मागणी केली आहे.पूर्वी चार तासांचे सत्र होते. आता तीन तासांचेच सत्र असून, त्यात पूर्वीप्रमाणेच बदल करावा. कलामंदिराबाहेरील नाटकांच्या जाहिरात फलकांसाठी आकारले जाणारे प्रतिदिन शुल्क रद्द करावे, पाचशे रुपयांच्या आत तिकीट असेल तर वेगळे शुल्क आणि पाचशेपेक्षा अधिक दर असेल तर वेगळे शुल्क असे दर पत्रक ठरले होते. मात्र त्यात ऐनवेळी जाचक बदल करण्यात आला. तो ठरल्याप्रमाणेत करण्यात यावा, नाटक रद्द झाल्यास अनामत रक्कम परत मिळावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.लावण्यांनाही परवानगी देणारकलामंदिरात यापूर्वी लावण्यांना परवानगी होती. मात्र लावणीच्या कार्यक्रमास अनेक जण मद्यपान करून येत, तर काही कार्यक्रमस्थळी मद्यपान करत असत. काहीवेळा लावणीच्या नावाखाली अश्लील कार्यक्रम सादर होत असल्याने हा प्रकार वादग्रस्त ठरला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान कलामंदिराच्या खुर्च्या आणि अन्य साहित्यांचे नुकसान होत असल्याने अखेरीस महापालिकेने लावण्यांना बंदी घातली होती. मात्र सभापती निमसे यांनी लावणी ही महाराष्टÑाची परंपरा असून या कार्यक्रमांनादेखील परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. कालामंदिरात सीसीटीव्ही लावण्यात येईल त्यामुळे मद्यपानाला प्रतिबंध होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा