शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

कलावतांचा सामूहिक विमा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:26 IST

नाट्य परिषदेच्या सदस्य असलेल्या कलावंतांचा सामूहिक विमा काढण्याचा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वार्षिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा कालावधी सहा दिवसांचा असावा, रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यसंगीताच्या स्पर्धा भरवायला हव्यात यांसह विविध ठराव नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने आयोजित वार्षिक सभेत मांडण्यात आले.

नाशिक : नाट्य परिषदेच्या सदस्य असलेल्या कलावंतांचा सामूहिक विमा काढण्याचा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वार्षिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा कालावधी सहा दिवसांचा असावा, रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यसंगीताच्या स्पर्धा भरवायला हव्यात यांसह विविध ठराव नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने आयोजित वार्षिक सभेत मांडण्यात आले. रविवारी (दि. ३०) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या सभागृहात प्रा. रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सभेदरम्यान सभासदांनी विविध सूचना केल्या. प्रवीण कांबळे यांनी नाट्यस्पर्धांमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाºया नाटकांची संहिता आणि प्रयोगाच्या सिडी नाट्य परिषदेच्या संग्रही असाव्यात अशी सूचना केली. श्रीकांत बेणी यांनी कलावंतांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबाला अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे या दृष्टीने सभासदांचा सामूहिक विमा काढण्यात यावा, असा ठराव मांडला तसेच काही सभासदांनी दिवगंत कलावंतांच्या मदतीसाठी देणग्या देणार असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांनी नाट्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच बैठकांबाबत माहिती मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी शाखेकडे उपलब्ध मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना काही सभासदांनी किमान आठवड्यातून एकदा शाखेला प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना अध्यक्ष प्रा.रविंद्र कदम यांनी संबंधितांना सुनावले. याबैठकी दरम्यान सुरेश कपोते, राजेश टाकेकर, रवींद्र बराते, मोहन गरगटे, शाहीर दत्ता शिंदे, चारुदत्त दीक्षित, सुरेश भामरे आदिंनी विविध सूचना आणि ठराव या सभेत मांडले. सभेची सुरुवात दिवंगत कलावंतांना आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी गेल्या वर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन परिषदेचे व्यवस्थापक मुकुंद गायधनी, आगामी आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन सहकार्यवाह आदिती मोराणकर, तर अंदाज पत्रकाचे वाचन खजिनदार रवींद्र ढवळे यांनी केले.नाट्यगृहाचा प्रारूप आराखडा दाखविणारनाट्य परिषद नाशिक शाखेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांनी नूतनीकरणानंतर महाकवी कालिदास कलामंदिराचे बदललेले रूप कसे असेल याचा प्रारूप आराखडा कलावंतांसह नाशिककरांना दाखविण्यात येणार असल्याची माहिती या वार्षिक सभेदरम्यान दिली. नाट्यगृह नूतनीकरण कामात असणारे अभियंता आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन हा आराखडा सादर करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचे पावित्र्य राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे हे सांगताना नूतनीकरणानंतर खºया अर्थाने जबाबदारी वाढणार असल्याकडेही खैरे यांनी यावेळी लक्ष वेधले.प्रेक्षक आणण्याचे ‘टार्गेट’सभासद विविध सूचना करीत असताना प्रकाश साळवे यांनी रंगभूमीदिनाला पे्रक्षक तसेच शाखेचे सभासद उपस्थित राहत नसल्याची खंत व्यक्त केली. यापुढे रंगभूमी दिनाच्या प्रत्येक कलाकाराने कार्यक्रमासाठी किमान दहा प्रेक्षक आणावेत, असे आवाहन केले.