शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:56 IST

जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक : जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधनझाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रख्यात गुरु आणि विद्वान पं. स. भ. देशपांडे यांच्याकडे काकासाहेब घारापूरकर यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर येथे त्याकाळात अनेक मोठ्या कलावंतांचे कार्यक्र म आयोजित केले. याशिवाय अनेक नामवंत कलावंतांना त्यांनी संवादिनीची साथसंगत केली. त्यात पं. बसवराज राजगुरू, पं. वसंतराव देशपांडे, पं. पद्माकर कुलकर्णी, पं. राजा काळे अशा अनेक प्रसिद्ध कलावंतांचा समावेश होता. त्या काळात नाशिक म्युझिक सर्कलची स्थापना करण्यासह जिल्हा सांस्कृतिक संघटनेचे ते महत्त्वाचे सदस्य होते. या संस्थेतर्फे नाशिकमध्ये दरवर्षी शास्त्रीय संगीताचा मोठा महोत्सव होत असे. त्याचप्रमाणे नाशिकच्या मेनरोडवरील गणपती मंदिरातील शास्त्रीय संगीताची परंपरा त्यांनी अनेक वर्ष चालवून संगीत सेवा केली. संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलेले असून, त्यांनी संगीत दिलेली योगगीतेही प्रसिद्ध आहेत. नाशिकमध्ये पूर्वी कलाअर्घ्य संस्थेने सादर केलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या संगीत संयोजनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरू म्हणून देखील पं. घारापूरकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुनील देशपांडे, मृदुला देव यांचा समावेश आहे.

टॅग्स :Deathमृत्यूmusicसंगीत