शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:49 IST

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाºया काकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ एस़ नायर यांनी सोमवारी (दि़१७) दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ गंगाराम गोविंद राऊत (३३, रा़ मेहदर, बंगाळपाडा, ता़ कळवण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, २०१६ मध्ये ही घटना घडली होती़ सरकारी वकील गायत्री पटनाला व एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़

नाशिक : अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाºया काकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ एस़ नायर यांनी सोमवारी (दि़१७) दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ गंगाराम गोविंद राऊत (३३, रा़ मेहदर, बंगाळपाडा, ता़ कळवण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, २०१६ मध्ये ही घटना घडली होती़ सरकारी वकील गायत्री पटनाला व एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़जिल्हा व सत्र न्यायाधीश नायर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी बारा, तर अ‍ॅड़ एस़ बी़ सरोदे यांनी चार साक्षीदार तपासून न्यायालयात पुरावे सादर केले होते़  यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, भाऊ व वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले़ या खटल्यात न्यायाधीश नायर यांनी आरोपी गंगाराम राऊत यास दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़  कळवण तालुक्यातील बंगाळपाडा येथे २०१६ मध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने बलात्कार केल्याची घटना घडली होती़ मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या प्रकरणी बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधोर यांनी करून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी