शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओझर नगरपरिषदेसाठी कदम यांची न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:16 IST

ओझर : ओझर सह राज्यातील तेरा नगरपरिषदे बाबत कार्यवाही प्रस्तावित असल्याने राज्य शासनाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका न घेता नगरपरिषदेचीच निवडणूक जाहीर करण्यात यावी यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ओझर : ओझर सह राज्यातील तेरा नगरपरिषदे बाबत कार्यवाही प्रस्तावित असल्याने राज्य शासनाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका न घेता नगरपरिषदेचीच निवडणूक जाहीर करण्यात यावी यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर पर्यंतच्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना त्यातील काही गावे ही नगरपंचायत,नगरपरिषद मध्ये रूपांतरित झाल्याची घोषणा झाल्याने मोठा संभ्रम बघण्यास मिळाला होता. परंतु शासनाने ओझरसह इतर नगरपरिषदांची प्रक्रिया सुरू केल्याने त्या गावांत ग्रामपालिका निवडणूक न घेता थेट नगरपरिषदेचीच निवडणूक घेण्यात यावी. जेणेकरून सरकारचा होणारा खर्च वाचेल. तसेच मुदत संपलेल्या स्थानिक ग्रामपालिका सदस्य देखील न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे नगरपरिषदेची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही अवधी लागणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात यावी असे देखील शासनाच्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकमेव नगरपरिषद म्हणून जाहीर झालेल्या ओझर ग्रामपलिकेची घोषित झालेली निवडणूक न घेता थेट नगरपरिषदची घ्यावी यासाठी अनिल कदम आग्रही असून प्रक्रियेत कुठेही अडचण नको म्हणून त्यांनी याचिका देखील दाखल केली आहे.------------------नगरपरिषदेत रूपांतरीत होणाऱ्या ग्रामपालिकाओझर(नाशिक), घुग्घूस(चंद्रपुर), नातेपुते,महाळुंग श्रीपुर, अकलूज, वैराग (सोलापूर), नशिराबाद (जळगाव), तिर्थपुरी (जालना), मंचर, माळेगाव, औताडे, हांडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी(पुणे) लेहगाव, शिवर(अमरावती).

टॅग्स :Nashikनाशिक