शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'बम-बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमली शिवमंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:10 IST

नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदिरात हजेरी लावून शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन घेतले. ...

ठळक मुद्देशिवमंदिरात शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी

नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदिरात हजेरी लावून शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन घेतले. गंगापूर शिवारातील जुन्या प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून, भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले होते. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची आख्यायिका आहे. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची पावले वळल्याने गाभा-यापुढे रांगा लागल्या होत्या.

सकाळी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त भीमराव पाटील, बापूसाहेब गायकर, राहुल बर्वे, बाळासाहेब लांबे, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा आदी उपस्थित होते. शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंडाजवळ असलेले कपालेश्वर महादेव मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. नंदी नसलेले एकमेव महादेव मंदिर म्हणून कपालेश्वरची ओळख आहे. सोमवारी पहाटे भाविकांसाठी कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.

कपालेश्वर मंदिरातील पुजारींनीसाकाळी पिंडीला रु द्राभिषेक करुनमहादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन व महाआरती केली. तिसरा सकाळपासूनच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या.भाविकांचीगर्दी लक्षातघेता दक्षिण दरवाजाने प्रवेश वउत्तर दरवाजाने बाहेर जाण्याचीव्यवस्था केली होती. मुख्य मंदिराच्या गाभा-यामध्ये विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती.

महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची पालखीसोमवारी सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून महादेवाच्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत महादेवाचा पंचमुखी मुखवटा ठेवण्यात येतो व पालखी अग्रभागी असते. पालखीपुढे ढोल, ताशा वादक असतात तसेच शंखध्वनीचाही निनाद केला जातो. कपालेश्वर मंदिरातून पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शिनचौक, काळाराम मंदिर, सरदारचौक, साईबाबा मंदिर रस्त्याने काढण्यात येऊन रामकुंड येथे पालखीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. लवकरच मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखी समारोप करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकHinduismहिंदुइझमtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर