शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

आमदाराच्या मंडळाचा डीजे लावून दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:07 AM

उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व तुंबळ हाणामारीची घटनादेखील घडली़

नाशिक : उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व तुंबळ हाणामारीची घटनादेखील घडली़ विशेष म्हणजे या डीजेच्या दणदणाटाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालेली असतानाही पोलिसांनी मात्र डीजे नाही तर सूचना देण्यासाठी स्पीकर लावल्याचे सांगत आमदारांचा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला असून, आडगाव पोलिसांनी अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल करून कर्तव्यबजावणीचे सोपस्कार पार पाडले आहेत़भाजपाचे नगरसेवक तथा आमदारपुत्र मच्छिंद्र सानप यांच्या कृष्णनगर मित्रमंडळ, तपोवन कॉर्नर मित्रमंडळाने तपोवनात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी एका स्टेजची उभारणी केली होती. या ठिकाणी गुलालाची मनसोक्त उधळण तसेच डीजेच्या तालावर मच्छिंद्र सानप यांनी ठेकाही धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ रात्रीच्या सुमारास तपोवनात डीजेचा दणदणाट सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून काही कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, यामुळे एकच धावपळ होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़  या हाणामारीच्या घटनेनंतर युवक घटनास्थळावरून फरार झाले़गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे़ या बंदीला न जुमानता आमदारांच्या मित्रमंडळाने हा दणदणाट केला आहे़ सानप हे सत्ताधारी पक्षाचे आमदार व त्यांचे पुत्र हे नगरसेवक असल्याने पोलीस प्रशासनही सानप यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. तपोवन परिसरात मंडळाने सूचना देण्यासाठी स्पीकर लावलेले होते तसेच गोंधळ घालणाºया अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल करून आडगाव पोलिसांनी आपले सोपस्कार पार पाडले आहेत़ विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डीजे लावून नाचण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही गुन्हा दाखल करताना डीजे सुरू असल्याचा कोणताही उल्लेख फिर्यादीत न करता पोलिसांनी आमदारांना पूर्णपणे अभय देण्याचे काम केल्याची चर्चा आहे़ राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात हे षडयंत्र असल्याचा पवित्रा आमदार बाळासाहेब सानप यांनी घेतला आहे़पोलिसांची अजब न्यायपद्धतीगतवर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे सांगत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक गजानन शेलार यांना अटक करण्यासाठी जंग-जंग पछाडले होते़ तसेच न्यायालयाकडून जामीन नामंजूर झाल्यानंतर शेलार यांना अटक करून मोठी मर्दुमकी गाजविल्याचा आविर्भावही पोलिसांनी दाखविला होता़ मात्र, आमदार व नगरसेवक सानप यांच्या मित्रमंडळाने डीजे दणदणाट करूनही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता उलट चांगले सहकार्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे़ यामुळे पोलिसांच्या या अजब न्यायपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा आहे़ बदनाम करण्याचा प्रयत्नगत ३० ते ३५ वर्षांपासून राजकारणात असून आतापर्यंत गणेशोत्सवात कधीही मिरवणूक काढली नाही़ शांतता समितीचा सदस्य असून नियमांची पायमल्ली केलेली नाही़ राजकीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे़- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMLAआमदार