नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासुनच कोरोना बाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसात नाशकात झालेले बाधित दोन-तृतीयांश प्रमाण हे केवळ जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसरातील असल्याने आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही सर्व सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे.जुने नाशिक भागातील कथडा, गंजमाळ, भद्रकाली, मदिना चौक, दूध बाजार, कोकणी पुरा, कुंभार वाडा, नानावली, मोठा राजवाडा, वडाळा नाका, वडाळा गाव संपूर्ण परिसरातील घरांपैकी कुठे ना कुठे कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील सर्वाधिक घनदाट वस्ती ही या परिसरातच आढळून येते. या भागांमध्ये बहुतांश घरे ही एकमेकांना लागून आणि समोरील घरेदेखील अवघ्या काही फुटाच्या अंतरावर असल्याने नाशिक विभागातील कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या याच भागांमधून निर्माण होण्याची भीती आरोग्य विभागासह महापालिका प्रशासनाला वाटत आहे. जिल्हच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थही कसोशीने नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र कोरोनापूर्वीच्या जगात वावरत असल्यासारखेच महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच आठवडाभरापासून नाशिकमधील बाधित रुग्णसंख्या तसेच मयत व्यक्तींच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत असून नाशिक शहरात झालेले सर्वाधिक मृत्यू हे जून महिन्यात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे जुने नाशिकसाठी जून महिना ठरतोय संकटाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:53 IST
जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासुनच कोरोना बाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसात नाशकात झालेले बाधित दोन-तृतीयांश प्रमाण हे केवळ जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसरातील असल्याने आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही सर्व सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे जुने नाशिकसाठी जून महिना ठरतोय संकटाचा
ठळक मुद्देजुने नाशिक आणि वडाळा गावात रुग्णसंख्येत वाढजून महिन्यात वाढलेली रुग्णसंख्या चिंताजनक मृतांच्या आकड्यांतही जूनमध्ये झाली वेगाने वाढ