शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या मुदतवाढीवरुन जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:30 IST

 त्र्यंबकेश्वर : धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देयावर्षी दर महिन्याला भरणारी वारी उटीची तसेच पंढरपुर यात्रेसाठी जाणारा दिंडी पालखी सोहळा शासनाच्या आदेशाचा स्थगित करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत २० मे २०२० रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन नियुक्तीबद्दल दोन गटात जुंपली असून सध्या कोरोनासारख्या संकट काळात नव्याने नियुक्त्या न करता आहे त्याच विश्वस्त मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली असताना अन्य एका गटाने या मुदतवाढीस विरोध दर्शविला आहे. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असणार आहे.संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती २० मे २०१५ मध्ये झाली होती. पाच वर्षाची मुदत दि. २० मे २०२० रोजी संपुष्टात आली. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या नियुक्ती नव्याने करु न विद्यमान विश्वस्त मंडळास बरखास्त करावे अशी मागणी सहाय्यक धर्मदाय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेठ कमानकर, बाळा साहेब काकड, मोहन जाधव, नितीन सातपुते, अमर ठोंबरे, प्रसाद देशमुख आदिंनी एका निवेदनाद्वारे केली आहे. एकीकडे एका गटाने मुदतवाढीस विरोध दर्शविला असतानाच संस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाने यापूर्वीच धर्मादाय आयुक्त मुंबई व धर्मादाय उपायुक्त नाशिक विभाग यांना निवेदन देत सध्याच्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात निवडणुका घेणे उचित नसल्याचे म्हटले आहे. यावर्षी दर महिन्याला भरणारी वारी उटीची तसेच पंढरपुर यात्रेसाठी जाणारा दिंडी पालखी सोहळा शासनाच्या आदेशाचा स्थगित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विश्वस्त मंडळाची नव्याने नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही, असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक