शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नामदारांच्या कार्यक्रमात आजी-माजी आमदारांची जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:07 IST

ओझर : जिल्ह्याच्या राजकारण सर्वाधिक सजग असलेल्या निफाड तालुक्याचे राजकारण अद्यापही भल्याभल्यांना उमगलेले नाही.त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर ...

ठळक मुद्देकदमांच्या गुगली चेंडूवर बनकारांची द्रविड खेळी

ओझर : जिल्ह्याच्या राजकारण सर्वाधिक सजग असलेल्या निफाड तालुक्याचे राजकारण अद्यापही भल्याभल्यांना उमगलेले नाही.त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या बँकेच्या कार्यक्रमात आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम एकत्र आल्याने पुन्हा एकदा वैचारिक जुगलबंदी तालुकावासीयांना बघावयास मिळाली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या बँकेच्या निफाड शाखेच्या नूतनीकरण समारंभास त्यांचे नेते अनिल कदम यांनी हजेरी लावली.सत्कार स्वीकारायच्या क्षणी आमदार दिलीप बनकर हे तेथे उपस्थित झाले.मग पूजा अर्चा करून क्षिरसागर यांनी दोघांचा सत्कार एकाच वेळी करण्याचे ठरवले.कट्टर राजकीय विरोधक असे दुसऱ्यांदा एकत्र आल्याने सर्वत्र चर्चा तर होणारच. नेमके झालेही तसेच कदमांनी सुरवातीला मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे असल्याने शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे असे सांगितले त्यावर तेथे असलेल्या बाळू नानाने किंगमेकर शरद पवार असल्याचे सांगितले यावर एकच हशा पिकला.मध्ये नामदार आणि आजूबाजूला आजी माजी आमदार बसल्याने क्षीरसागर स्वभावाप्रमाणे शांतच बसून होते.कदमांनी लागलीच निसाका कधी सुरू करताय असे विचारले.त्यावर तो लवकरच होईल असे बनकर यांनी सांगितल्या बरोबर कदम यांनी निसाका बद्दल बोलतोय रासाका तर कुणीही घेईल त्यावर बनकर यांनी होणार चालू बघत राहा.रासाका अतिशय सोपा आहे सुरू करणे पण निसाका हा अवाढव्य असल्याने तो सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कॅलिफोर्निया असलेला निफाड सहकारात पुन्हा झेंडा रोवेल असे उपस्थित म्हणत होते.मुख्य म्हणजे राज्यात सजग व बागायत तालुक्याचे दोन राजकीय विरोधक दुसऱ्यांदा एकत्र आले होते.खरे म्हणजे बँक नूतनीकरणच्या कार्यक्रमात तोंडी का होईना कारखाना सुद्धा नूतनीकरण होऊन त्यात लवकरच मोळी टाकू असे बनकर यांच्या बोलण्यातून जाणवल्याने तालुक्यातील जाणत्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहे.जंग अजून चार वर्षे चालणार आहे.त्यात आणखी किती पूर येतात हा मुख्य मुद्दा आहे.खरेम्हण्जे केवळ निवडणुकीत कट्टर विरोध दाखवायचा आणि तालुक्याच्या विकासात एकत्र आल्यास खरोखर राजकीय कलह दूर होण्यास मोठी मदत होईल शिवाय कार्यकर्त्यांना देखील योग्य संदेश जाईल.एरवी राजकीय कट्टरता योग्य पद्धतीने सांभाळणाऱ्या निफाड मध्ये शुभवर्तमान आल्याने सर्वांना आश्चर्य झाले असणार. त्यात योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा निफाडचेच असल्याने त्या निवडीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या सुद्धा दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर होत्या.खरेतर अशा शुभप्रसंगी नेते एकत्र येऊन हसता खेळता विचार व्यक्त करू शकतात तर कार्यकर्त्यांनी कसला होरा मनात ठेवायचा असा थेट सवाल तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये रंगून गेला आहे.

 

टॅग्स :MLAआमदारnifadनिफाड